fbpx

श्रीपाद छिंदमला चोप देणाऱ्या शिवसेना नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर : शिवद्रोही अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदमला मारहाण करणाऱ्या नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवक योगिराज गाडे, अमोल उर्फ ज्ञानेश्वर येवले, विजय पठारे, अनिल शिंदे व अन्य चार जणांविरुद्ध शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी स्वत: श्रीपाद छिंदमने फिर्याद दाखल केली होती.

नगर महापौरपदाच्या निवडणुकीवेळी शिवद्रोही श्रीपाद छिंदम याने शिवसेनेला मतदान केले म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकांनी छिंदमला चांगला चोप दिला. त्यानंतर जिल्ह्याधिकाऱ्यांनी श्रीपाद छिंदमला मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.