मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाला आव्हान दिलं होतं. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे अनेक प्रकणांवरुन कोर्टात जावं लागत आहेय. यावरुनच हे आव्हान देण्यात आलं होतं. याला शिंदे गट काय उत्तर देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अशातच शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिलं आहे.
आम्हीपण मैदानातच आहोत, घरात बसलेलो नाही. हे अडीच वर्षं घरात बसले होते, तेव्हाही आम्ही मैदानात होतो आणि आत्ताही आहोत. हे आमच्यामुळे अडीच वर्षानंतर मैदानात आले आहेत. ही क्रांती झाली नसती तर अजून अडीच वर्षं घरातच बसून राहिले असते. कोण कोणाल काय दाखवतं हे अडीच वर्षानंतर कळेलच, असं भमुरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित ‘अमृत महोत्सव’ कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी हे आव्हान दिलं होतं. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला न्यायालयात जावं लागत आहे. मैदानासाठीही न्यायालयात जावं लागलं. हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या, माझी तयारी आहे. मी मैदानात उतरलो आहे. आम्हाला मैदान कसं मिळणार नाही यापेक्षा एका मैदानात, व्यासपीठावर येऊ आणि काय व्हायचं ते होऊन जाऊ दे, असं ठाकरे म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :