मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. शिवसेनेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याचं समोर आलं आहे. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन वेगळा गट स्थापन केला आहे. या सर्व घडामोडी घडत असताना शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांच्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदे गटाचे सर्व आमदार सध्या आसामच्या गुवाहाटी येथे तळ ठोकून आहेत. यावेळी या गटातील गुवाहटी येथील हॉटेलमध्ये झालेल्या संभाषणाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये शिंदे यांच्याबरोबर प्रताप सरनाईक, भरत गोगावले, बच्चू कडू हे चर्चा करत होते. या चर्चेमधून काही धक्कादायक वाक्ये समोर आली आहेत. शिंदे गटाकडे शिवसेनेची सूत्रे आल्यानंतर पहिल्यांदा कोणावर कारवाई करायची. याबाबतची चर्चा या व्हिडिओमध्ये ऐकू येतेय.
शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांनी पहिल्यांदा सुनील प्रभू यांना हाकलणार असल्याचे वाक्य या व्हिडिओमध्ये ऐकू येतंय. सरनाईक म्हणाले, कोणाला पक्षात ठेवायचे कोणाला काढायचे याचे अधिकार आता भरत गोगावले यांना दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेल्या आमदारांना पक्षातून काढायचे असेल तर सुनील प्रभू यांच्यापासून सुरुवात करावी लागणार आहे, असे सरनाईक म्हणत असल्याचं व्हिडिओतून ऐकू येतंय.
महत्वाच्या बातम्या :