Share

Eknath Shinde | “…उद्भवजींचा दौरा तासाभरात झाला”, शिंदे गटाने काव्य करत उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर साधला निशाणा

Eknath Shinde | मुंबई : परतीच्या पावसामुळे मराठावाडा येथील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याचीच पाहणी करण्यासाठी काल माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मराठवाडा म्हणजेच औरंगाबाद दौऱ्यावर होते. या दौऱ्यावरुन सत्ताधारकांनी चांगलाच निशाणा साधला आहे. अशातच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील नेते म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

बांद्रा ते बांध मारली त्यांनी उडी, मतोश्रीही आनंदून गेली असेल बापुडी, कधी नव्हे तो क्षण हा भाग्याचा आला, उद्भवजींचा दौरा तासाभरात झाला, असं काव्य नरेश म्हस्के यांनी केलं आहे. ते गेले त्यांनी पाहिलं काय समजलं माहीत नाही, शेतकऱ्याचा हात मात्र रिकामाच राही, असा टोला देखील म्हस्केंनी लगावला आहे.

पाहा ट्विट –

दरम्यान, कृषीमंत्री अब्दुल सत्ता यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर निशाणा साधला होता. यावेळी मी त्यांच्या दौऱ्यातील मिनीट टू मिनीट कार्यक्रम पाहिला त्यानंतर असं दिसून आलं की 24 मिनिटांसाठी ते शेतकऱ्यांची विचारपूस करणार आहेत. आता यावेळेत ते किती पाहातील, काय पाहातील, किती ओला दुष्काळ पाहातील, असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. अब्दुल सत्तारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

सत्तार म्हणाले, मला हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आता परतीचा पाऊस संपलेला आहे. उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने दौरा काढला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानेल. किमीत कमी यंदा तरी अडीच वर्षानंतर त्यांचा दौरा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत येऊ लागला, याबद्दल त्यांना धन्यवादच द्यावे लागतील. 22-24 मिनिटं का असेना पण आले पाहणी करतील आणि ज्या सूचना ते मांडतील त्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निश्चितच विचार करतील.

पुढे बोलताना त्यांनी असंही सांगितले की, मी स्वत:चं कौतुक करत नाही, परंतु मी 69 तालुके आणि विशेषता 9 जिल्हे फिरलो हे सर्व माध्यमांनी दाखवलं. जेव्हापासून मी पदभार स्वीकारला, तेव्हापासून मेळघाट ते मराठवाड्याच्या शेवच्या टोकापर्यंत, कोकणापासून ते उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रापर्यंत अशाप्रकारे ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. सकाळी ७ वाजेपासून ते कधीकधी रात्र होत परंतु शेतकऱ्यांशी मी चर्चा करतोय. शेतकऱ्यांनी अजिबात निराश होऊ नये, त्यांच्या पाठिशी महाराष्ट्र सरकार आहे.

महत्वाच्या बातम्या :

Eknath Shinde | मुंबई : परतीच्या पावसामुळे मराठावाडा येथील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याचीच पाहणी करण्यासाठी काल माजी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now