मुंबई : शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून आलेले वादळ पूर्णपणे शांत होण्याचे नाव घेत नाही. एकनाथ शिंदे यांनी आधी शिवसेनेविरुद्ध बंडखोरी केली, नंतर भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झाले, मात्र दोन्ही गटांतील परस्पर शाब्दीक युद्ध अजूनही सुरूच आहे. उद्धव ठाकरे यांनी आज मुलाखतीतून शिवसेनेतील शिंदे गटावर निशाणा साधला होता, त्यावरही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे उद्या उत्तर दिले जाईल.
उद्धव ठाकरे यांच्या आरोपांवर केसरकर काहीच बोलले नाहीत असे नाही. उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना मोजक्या शब्दात उत्तर देताना ते म्हणाले, “आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे. आमच्या सर्व आमदारांकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उद्धव ठाकरे आम्हाला गळलेली पाने म्हणत आहेत. गळलेल्या पानांच्या सावलीतच ते मुख्यमंत्री झाले होते. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या आरोपांवर उद्या उत्तर देऊ.”
आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना केसरकर म्हणाले, “आदित्य ठाकरेंनी आम्हाला सांगितलं की, हिंमत असेल तर राजीनामा द्या, निवडणूक लढवा. 2019 मध्ये आम्ही निवडणूक लढवली तेव्हा आम्ही भाजपसोबत होतो. लोकांनी शिवसेना-भाजपच्या नावावर मतदान केले. मात्र तुम्ही (आदित्य ठाकरे) काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करून जनतेच्या निर्णयाचा अपमान का केला? मग भाजप सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करताना तुम्ही निवडणुकीला सामोरे का गेला नाही?”
पक्षप्रमुखपद उद्धव ठाकरे यांच्यासाठी रिक्त ठेवले
केसरकर पुढे म्हणाले की, “कोरोनामध्ये उद्धव ठाकरेंनी चांगले काम केले, त्यामथे एकनाथ शिंदे यांचेही योगदान आहे. एकनाथ शिंदे यांनी कोरोनामध्ये स्थानिक पातळीवर खूप काम केले आहे. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुखांऐवजी माजी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. ते चुकीचे घेऊ नका. माजी मुख्यमंत्री म्हणजे ते केवळ एका पक्षाचे नसून संपूर्ण राज्याचे आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आम्ही पक्षप्रमुखपद उद्धव ठाकरे यांच्यासाठी रिक्त ठेवले आहे.”
मुख्यमंत्र्यांचे वारंवार दिल्लीत जाणे म्हणजे…
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केसरकर म्हणाले, “मंत्रिमंडळ विस्तार हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यरत आहेत. ते योग्यवेळी विस्तार करतील. आम्ही आमदारांनी कधीही मंत्री होण्यासाठी किंवा मंत्रिमंडळ विस्तारासाठी दबाव आणला नाही. मुख्यमंत्र्यांचे वारंवार दिल्लीत जाणे म्हणजे ते दिल्लीसमोर गुडघे टेकायला जातात असे नाही. महाविकास आघाडीच्या सरकारमध्येही नेते दिल्लीत जात असत.”
महत्वाच्या बातम्या :
- Bhai Jagtap | तब लडे थे गोरोसे अब लडेंगे चोरोसे – भाई जगताप
- Chandrakant Khaire : रामदास कदमांना मराठा नेत्यांवरून समाजात तेढ निर्माण करायचाय, चंद्रकांत खैरेंच वक्तव्य!
- Ramdas Kadam : आदित्य ठाकरेंना स्वत:चं खातं राहिलं बाजूला इतरांची खाती सांभाळायची आहेत; रामदास कदमांचा गंभीर आरोप
- NCP on Shinde government | सत्तेसाठी लाचारी करणाऱ्यांना जनतेचे हाल दिसत नाहीत ; राष्ट्रवादीची शिंदे सरकारवर टीका
- Ramdas Kadam : उद्धव ठाकरे मराठा समाजाच्या लोकांना मोठं होऊ देत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<