Share

Eknath Shinde | “आमदारकी पदरात पाडण्यासाठी सुषमा अंधारे…”, शिंदे गटाची बोचरी टीका

Eknath Shinde | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आक्रमक नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शिंदे गटावर अनेकवेळा धारेवर धरत टीकास्त्र सोडलं आहे. यावरुन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे नेते नरेंद्र बोंडेकर (Narendra Bondekar) यांनी सुषमा अंधारे यांच्यावर घणाघात केला आहे. तसेच सुषमा अंधारेंची महाप्रबोधन यात्रा विदर्भात जाणार आहे.

यावेळी, सुषमा अंधारे प्रखर आंबेडकरवादी चळवळीतून आल्या असून, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची आहे. बाळासाहेबांचे विचार आणि प्रखर हिंदूत्व सुषमा अंधारेंनी स्वीकारलं का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सोडले असतील, तर ते बाळासाहेबांचे विचार स्वीकारतील का? तीन महिन्यात हिंदूत्व समजणे सोप्प नाही, असं नरेंद्र बोंडेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, “सुषमा अंधारेंनी विदर्भातून निवडणूक लढवावी,” असे आव्हान देत नरेंद्र बोंडेकर म्हणाले, “त्यांनी आतापर्यंत कोणतीही निवडणूक लढवली नाही. नेत्यांना खूश करुन विधानपरिषद आमदारकी पदरात पाडून घेण्यासाठी त्या स्टंटबाजी करत आहेत. यापेक्षा त्यांनी लोकांमधून निवडून आलं पाहिजे. भगवा घालून टीका करणे, आव्हान देणे हे चालत नाही. लोकांची कामे करून निवडून येतात, त्याला खरे नेतृत्व म्हणतात, असं देखील बोंडेकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

Eknath Shinde | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आक्रमक नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शिंदे गटावर अनेकवेळा …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics