Share

Sanjay Raut | संजय राऊतांच्या ‘त्या’ भाकीतवर शिंदे गटाकडून प्रत्युत्तर, म्हणाले…

Sanjay Raut | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे सरकार कधी पडणार याबाबत दावा केला. या भाकीतवर शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी हे भाकित केलं होतं.

राज्य सरकार दोन महिन्यात पडेल – संजय राऊत अहो, तुमचे आघाडी सरकार २५ वर्षे चालेल म्हणाला होतात. एका रात्रीत ते कसे कोसळले माहीत आहे ना?, असं शितल म्हात्रे यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे जनतेची कामं करा, असं संजय राऊत म्हणाले.

रावसाहेब दानवे कधीकधी खरं बोलून जातात. दोन महिन्यांत काहीही होऊ शकतं. म्हणजे सरकार पडू शकतं. म्हणजे त्यांनी मध्यावधीचे संकेत दिले आहेत. हे सरकार १०० टक्के पडणार याविषयी मला पूर्ण खात्री आहे, असं देखील राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Sanjay Raut | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे सरकार कधी पडणार …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now