Share

Sharad Ponkshe | “सत्ता गेली म्हणून…”, शिंदे गटातील अभिनेते शरद पोंक्षें राष्ट्रवादीवर कडाडले

Sharad Ponkshe | मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचे ठाणे जिल्ह्यात प्रदर्शन रोखले. यावेळी प्रेक्षकांना मारहाण झाल्याची देखील चर्चा आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटाला महाराष्ट्रात मोठा विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील नेते आणि अभिनेते शरद पोंक्षें (Sharad Ponkshe) यांनी राष्ट्रवादी (NCP) पक्षावर कठोर शब्दांमध्ये घणाघात केला आहे.

यावेळी, राज्यातील सत्ता गेल्याने प्रसिद्धी मिळवण्यासाठी ही फालतू गिरी सुरू असल्याचा गंभीर आरोप पोंक्षे यांनी राष्ट्रवादीवर केला आहे. पुरोगाम्यांना हिंदू राष्ट्र म्हणणं आवडत नाही. हिंदू धर्म, हिंदू राष्ट्र नको आहे याचा त्यांना‌ त्रास होतो. सत्ता गेल्याने यांची फालतू गिरी चालू आहे, असा खोचक टोला शरद पोंक्षें यांनी लगावला आहे.

तसेच, शरद पोंक्षे हे रात्री एका पुरस्कार कार्यक्रमासाठी पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी ‘हर हर महादेव’ चित्रपटाला होत असलेल्या विरोधानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. सेनसाॅर संमत असलेला चालू सिनेमा बंद पाडता. प्रेक्षकांना मारहाण करता. तुम्ही गुंड आहात का? स्वतःला पुरोगामी समजता ना? मग तुम्हाला शाहू, फुले, आंबेडकरांनी हेच शिकवलं का? असे अनेक सवाल उपस्थित करत अप्रत्यक्ष जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीला टोला लगावला.

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपटावर टीका केली. “हर हर महादेव, या सिनेमात तर विकृतीचा एक वेगळाच कळस गाठला गेला. बाजीप्रभू देशपांडे चक्क महाराजांचे एकेरी नाव घेत त्यांच्याशी युद्ध करत आहेत. एका स्वामीनिष्ठ मावळ्याचा हा केवढा अपमान आहे! या सिनेमात बाजीप्रभू ही व्यक्तिरेखा खुद्द महाराजांपेक्षाही मोठी दाखवली आहे. महाराजांना प्रत्येक गोष्ट जणू काही बाजीप्रभूच शिकवत होते आणि महाराजांना, जिजाऊंना किंवा इतर दरबारी लोकांना काहीच माहीत नव्हते इतक्या दर्जाचा हा विपर्यास आहे. अफजलखानाचे पोट फाडताना महाराज खानाला मांडीवर घेतात, का तर महाराज हे नृसिंहअवतार वगैरे आहेत असे सुचवायचे आहे,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Sharad Ponkshe | मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचे ठाणे जिल्ह्यात …

पुढे वाचा

Entertainment Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now