Petrol Price | मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी सत्ता बदल झाला. यानंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले. तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. तसेच नवनिर्वाचत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल-डिझेलबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आज शिंदे सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली.
यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले कि, देशात मागील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यानंतर केंद्र सरकारने दर कमी केले होते. तसेच देशातील अनेक राज्यांनी दर कपात केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने केली नव्हती. मात्र आता आपण पेट्रोल पाच आणि डिझेल तीन रुपयांची दर कपात करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र यामुळे राज्याच्या तिजोरीवर सहा हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, याआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अजूनही मंत्रिमंडळ स्थापन न झाल्याने शिंदे सरकारवर टीका केली आहे. राज्यात सरकार अस्तित्वात नाही. दोघांनी शपथ घेतली म्हणजे सरकार आलं असं नाही. 12 दिवस झाले तरी सरकार अस्तित्वात नाही. कारण दोन लोकांचं सरकार हे बेकायदेशीर आहे. आमदार अपात्रं ठरू शकतात. त्यांना शपथ देणं हा राजद्रोह आहे. हे घटनाबाह्य कृत्य आहे. हा राजकीय भ्रष्टाचार आहे. त्याची भीती असल्याने त्यांना रोखलं असावं. राज्यपालांनी कोणतंही घटनाद्रोही कृत्य करू नये, असं म्हणत राऊतांनी जोरदार निशाणा साधलाय.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde : “१८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना बुस्टर डोस मोफत”, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Sanjay Raut : “फक्त दोघांनी शपथ घेतली, म्हणजे सरकार आलं असं नाही”; राऊतांचा शिंदे-फडणवीसांना टोला
- Clyde Crasto : “क्या इस कहानी मे ट्विस्ट बाकी है?”, राष्ट्रवादीचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला
- Mohan Bhagwat | फक्त खाणं आणि जन्माला घालणं ही कामं तर जनावरे देखील करतात – मोहन भागवत
- Urfi Javed | उर्फी जावेदचा ड्रेस पाहून तुम्हीही व्हाल ‘घायाळ’; नेटकऱ्यांच्या मजेदार कॉमेंट्स
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<