Shinde-Fadanvis | मुंबई : काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समोर आलेलं नाहीये. मात्र, जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्या बाबत यामध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. तसेच मंत्रीमंडळ विस्ताराबाबत देखील चर्चा झाल्याची शक्यता आहे.
यादरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचं नियोजन सुरू आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची तारीखही जाहीर केली जाणार आहे.
रात्री उशिरा झालेल्या या भेटीचा तपशील अद्याप गुलदस्त्यातच आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी अशाच रात्री उशिरा बैठकी झाल्या आहेत. त्यामुळे आता या बैठकीनंतर कोणता महत्त्वाचा निर्णय होणार याची उत्सुक्ता आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | जितेंद्र आव्हाड राजीनामा देणार का?, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
- Shinde-Thackeray | ठाण्यात शिंदे-ठाकरे गट आमने सामने! राडा, धक्काबुकी अन् एक कार्यकर्ता जखमी
- Sushama Andhare | “देवेंद्र फडणवीस सत्ता प्रेमाने…”, सुषमा अंधारे यांचा उपमुख्यमंत्र्यांवर घणाघात
- Eknath Shinde | जितेंद्र आव्हाडांवरील कारवाईबाबत एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले,
- Chandrashekhar Bawankule | “आगामी काळात राष्ट्रवादीला उमेदवारही मिळणार नाहीत”; बावनकुळेंची बोचरी टीका