मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस असं नवीन सरकार स्थापन झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची काल शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं तीन पक्षांचं मिळून सरकार स्थापन झालं होतं. तेव्हा त्या सरकारला तीन चाकांची ऑटो रिक्षा असलेले सरकार असं संबोधण्यात आलं होतं.
आता राज्य मध्ये नव्याने स्थापन शिंदे फडणवीस हे सरकार दोन चाकांची स्कूटर असल्याचं वक्तव्यं राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी सरकारवर टीका करत दोन चाकांची स्कूटर असे संबोधन स्कूटरचा हँडल मागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात असल्याची जहरी टीका केली आहे.
“शिवसेनेचे बंडखोर आमदार काही म्हणत असले तरीही उद्धव ठाकरे साहेबांची खरी शिवसेना आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची माफी मागितली पाहिजे” असंही महेश तपासे यावेळी म्हणाले.
सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा यांच्या बाबतीत आज निर्णय दिला. या निर्णयाचे स्वागत करत भाजपने देशाची माफी मागितली पाहिजे असेही महेश तपासे यावेळी म्हणाले
दरम्यान, शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. यासंदर्भात देखील महेश तपासे यांनी भाष्य केले आहे. “हा योगायोग आहे की ठरवून राजकीय षडयंत्र करण्यात येत आहे हे पाहावे लागेल. देशपातळीवर ज्या-ज्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाजप विरोधात आवाज उठवला त्या ममता बॅनर्जी, केजरीवाल, राहुल गांधी असतील या सर्वांना केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून नोटीसा पाठवल्या जात आहेत. पवार साहेब या नोटीसीचे समर्पक उत्तर देतील याबाबत आम्हाला शंका नाही” असा विश्वास यावेळी महेश तपासे यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या :
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<