fbpx

शरद पवारांच्या कार्यक्रमाला आ.शिंदे व देशमुखांचा एकाच गाडीतुन प्रवास, माढ्यातुन पुन्हा देशमुखांची चर्चा

माढा / हर्षल बागल : टेभुर्णी येथे राजर्षी शाहु अँकडमी यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास मेळावा तसेच स्पर्धा परिक्षा मेळावा या निमित्ताने राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे , मा. आयुक्त प्रभाकर देशमुख, जि.प. अध्यक्ष संजय शिंदे एकत्र होते. टेभुर्णीचा कार्यक्रम झाल्यानंतर आ. बबनदादा शिंदे व प्रभाकर देशमुख सांगोला येथील शरद पवार यांच्या कार्यक्रमाला एकाच गाडीतुन गेले. यामुळे ऊपस्थितांमध्ये राजकिय चर्चांना पेव फुटले होते.

खा. शरद पवार पुन्हा माढ्यातुन ऊभारणार अशा वावड्या असल्या तरी याला खुद्द शरद पवार यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. ते म्हणाले की पक्षातील अनेकांची इच्छा आहे की मी माढायातुन ऊभा राहावे पण ऊभा राहणारच असेही शरद पवार म्हणाले नाहीत. त्यामुळे शरद पवार यांनी अजुन माढ्याचे घोंगडे भिजतच ठेवले आहे. तर टेभुर्णी ते सांगोला आ.शिंदे व देशमुख यांच्या एकत्र प्रवासाने मात्र मोहिते पाटिल यांच्या समर्थकांची चिंता अजुन वाढवली आहे.

लोकसभा अगदी काही दिवसावर येऊन ठेपली असली तरी राष्ट्रवादीने अजुन ऊमेदवार जाहिर केला नाही. टेभुर्णीच्या कार्यक्रमाआधी तब्बल अर्धा तास जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे व प्रभाकर देशमुख यांच्यात गुप्तगु झाल्याचे समजत आहे. नक्की काय व कोणत्या विषयावर बोलले हे देखील महत्वाचे आहे.

टेभुर्णीचा कार्यक्रम सुरु होण्याआधी देशमुखांची भेट घेण्यासाठी हाँटेल अतिथीवर जि.प. सदस्य रणजित शिंदे हे स्वता जातीने ऊपस्थित राहिले. व नंतर कार्यक्रम स्थळी रणजित शिंदे व प्रभाकर देशमुख यांनी एकाच गाडीतुन गेले. गेल्या काही दिवसापासुन शिंदे घराण्याशी आलेले निकटचे संबध आणी संजय शिंदे यांच्या सोबतच्या गुप्त बैठका तसेच आ. बबनदादा शिंदे व प्रभाकर देशमुख यांचा टेभुर्णी ते सांगोला एकत्र प्रवास देशमुखांना दिल्लीचा प्रनास घडवुन देतो का हे पाहणे ऊत्सुक्तेचे राहिल.

1 Comment

Click here to post a comment