fbpx

‘बिगबॉस 11’ वर मराठी झेंडा शिल्पा शिंदे ठरली विनर!

shilpa shinde

मुंबई : ‘बिग बॉस’ या वादग्रस्त कार्यक्रमाच्या अकराव्या पर्वानं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. रविवारी रंगलेल्या अंतिम फेरीत शिल्पा शिंदे हिने बाजी मारली. शिल्पाने टीव्हीची लाडकी ‘बहू’ हिना खान हिला मात देत ट्रॉफी आपल्या नावे केली आहे.

शिल्पा शिंदे हि भारतीय टेलीविजन अभेनेत्री आहे. शिल्पा नि १९९९ मध्ये टेलीविजन प्रवेश केला. आणि २००२ ते ०८ भाभीजी घरपे ही या मालिकेतून चर्चेत आली. त्यानंतर शिल्पा ने स्टार प्लस वर  कभी आये ना जुदाई २००१-०३ मध्ये काम केले. २००२-०५ ‘संजीवनी’, २००२ मध्ये ‘आम्रपाली’ या मालिकेत अभेनेत्री म्हणून काम केले.

शिल्पा शिंदेला भाभी जी घर पर है! मधून अंगुरी भाभी च्या भूमिकेतू खूप लोकप्रियता मिळाली. नंतर काही मुद्द्यावरून निर्मात्यांसोबत वाद झाल्यानंतर २००९ मध्ये ब्रेक घेतला. शिल्पा नि तेलगु छिन्ना आणि शिवानी चित्रपटात सुद्धा काम केले आहे. तब्बल एका वर्षानंतर शिल्पानी गेल्यावर्षी २०१७ मध्ये भारतीय रियालटी शो ‘बिग बॉस ११’ मध्ये आली. आणि १४ जानेवारी २०१८ ला तिला विजयी घोषित करण्यात आले.

shilpa

‘बिग बॉस’ या वादग्रस्त कार्यक्रमाच्या अकराव्या पर्वानं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. रविवारी रंगलेल्या अंतिम फेरीत शिल्पा शिंदे हिने बाजी मारली. शिल्पाने टीव्हीची लाडकी ‘बहू’ हिना खान हिला मात देत ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. विजयाची प्रबळ दावेदार असणाऱ्या हिना खानला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले शिल्पाला हिनाच्या तुलनेत प्रचंड वोट मिळाले. वास्तविक शोच्या सुरुवातीपासूनच शिल्पा शिंदे शोमध्ये विजेत्या ट्रॉफीसाठी प्रबळ दावेदार समजली जात होती. परंतु मधल्या काळात हिना खान आणि विकास गुप्ता तिच्यावर भारी पडताना दिसत होते. मात्र अखेर बिग बॉसने करोडो प्रेक्षकांची फेव्हरेट शिल्पा शिंदेलाच या शोची विजेता घोषित केले.

14big-boss

2 Comments

Click here to post a comment