पती राज कुंद्रा विरोधात शिल्पा शेट्टी देणार साक्ष

raj kndra

मुंबई : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत  होताना दिसत आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आलेला राज कुंद्रा त्याच्या जामिनाचा शोध घेत आहे. त्याचवेळी त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करून मुंबई गुन्हे शाखेने हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनवले आहे. पोलीस अहवालानुसार, अभिनेत्री शिल्पा शेट्टी शर्लिन चोप्रा देखील या प्रकरणात साक्षीदार आहे.

मुंबई पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या 1500 पानांच्या आरोपपत्रात एकूण 43 साक्षीदारांचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यात अनेक सुप्रसिद्ध नावांचा समावेश आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, आरोपपत्रात अभिनेत्री शिल्पा शेट्टीलाही साक्षीदार बनवण्यात आले आहे. याशिवाय अभिनेत्री शर्लिन चोप्रा देखील या प्रकरणात साक्षीदार आहे. या प्रकरणी दोघांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत.

उद्योगपती राज कुंद्रा व्यतिरिक्त, त्यांच्या कंपनीचे आयटी प्रमुख रायन थोरपे देखील या प्रकरणात पोलीस कोठडीत आहेत. बुधवारी मुंबई गुन्हे शाखेने मुंबईतील एस्प्लेनेड न्यायालयासमोर त्याचे पूरक आरोपपत्र दाखल केले. या पोर्नोग्राफी प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत अनेक अभिनेत्रींची चौकशी केली आहे. त्याचबरोबर अनेक अभिनेत्री कुंद्रावर गंभीर आरोप करताना दिसल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या