‘सुपर डान्सर-४’ शोमधून शिल्पा शेट्टी होणार एक्झिट?, तर ‘या’ अभिनेत्रीची होणार एन्ट्री

शिल्पा शेट्टी

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन मोबाईल अॅपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. फेब्रवारी महिन्यात मुंबई पोलिसांकडे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याच प्रकरणात राज कुंद्राला १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर बॉलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. राज कुंद्राला अटक झाल्यामुळे शिल्पाच्या कामावर त्याच्या परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘सुपर डान्सर-४’ या शो मध्ये शिल्पा परीक्षक म्हणून काम करत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून शिल्पाने शेट्टी ‘सुपर डान्सर-४’ शूटिंग करणं रद्द केलं आहे. मंगळवारी ‘सुपर डान्सर-४’ चं मुंबईत शूटिंग पार पडणार होतं. मात्र राज कुंद्राला अटक झाल्याने शिल्पा शेट्टी शूटिंगलला आली नाही. २० जुलैला या भागासाठी अभिनेत्री करिश्मा कपूर गेस्ट म्हणून हजेरी लावणार होती. मात्र शिल्पा  न आल्याने उर्वरित परिक्षकांच्या उपस्थितीत शूटिंग पार पडलं. सध्या शोची मेकिंग टीम शिल्पाच्या परतण्याची वाट पाहत असून शिल्पाला शूटिंगवर परतणं शक्य झालं नाही तर टीम करिश्मा कपूरशी संपर्क साधणार असल्याचे म्हंटले जात आहे.

शिवाय शिल्पा शेट्टीचा ‘हंगामा-२’ या चित्रपटावर देखील या प्रकरणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.  येत्या २३ जुलैला ‘हंगामा-२’ रिलीज होणार होता. राज कुंद्राला कोर्टाने सुनावली २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर आतापर्यंत या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP