शिल्पा शेट्टीने मागितली वाल्मिकी समाजाची माफी

मुंबई : जातिवाचक शब्दांचा वापर केल्याबद्दल अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने आज अखेर वाल्मिकी समाजाची माफी मागितली. ‘सुपर डान्सर २’ या रिअॅलिटी शोमध्ये शिल्पा आणि सलमान खान या दोघांनी जातिवाचक शब्दांचा वापर करून वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्या होत्या.

यानंतर वाल्मिकी समाजाने शिल्पा व सलमान या दोघांविरोधात तक्रार दाखल करून त्यांचे पुतळे जाळत आंदोलन केले. दरम्यान, महाराष्ट्रात सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचा निषेध करून चित्रपटाचे पोस्टरही जाळले. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता.

पण तरीही माझ्या शब्दांमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते, असे ट्विट करीत शिल्पाने जाहीर मागितली आहे. मात्र, सलमानने अद्यापही या प्रकरणी माफी मागितली नाही.