आयपीएलच्या इतिहासात कुणालाही न जमलेली कामगिरी शिखर धवनच्या नावावर

आयपीए

मुंबई :  शिखर धवन आणि पृथ्वी शॉच्या मदतीने दिल्ली कॅपिटलने आयपीएलच्या 14 व्या सत्रातील पहिल्या सामन्यात चेन्नईचा 7 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजीसाठी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकांत 7 गडी गमावल्यानंतर 188 धावांची सन्माननीय धावसंख्या उभारली.

यानंतर धवन आणि पृथ्वीच्या फलंदाजीमुळे दिल्लीने हे लक्ष्य सहज 18.4 षटकांत गाठले. धवनने 85 धावा केल्या आणि पृथ्वीने 72 धावांची तुफानी खेळी केली. दिल्लीने 7 गडी राखून चेन्नईचा या सामन्यात दारुण पराभव केला.

याचसोबत शिखर धवनने आयपीएलमध्ये इतिहास रचला. आतापर्यंत अशी कामगिरी कुणालाही जमली नाही. ती शिखर धवनने या सामन्यात करून दाखवले. आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये शिखर धवनने करिअरमध्ये  600 चौकार मारण्याचा इतिहास रचला आहे. काल 9 वा चौकार मारताक्षणी त्याने आयपीएलमधले 600 चौकार पूर्ण केले. आतापर्यंत 600 चौकार दुसऱ्या कोणत्याही खेळाडूने मारलेले नाहीत. शिखर धवनच्या नावावर आयपीएलमध्ये 600 चौकारांची नोंद झाली.

महत्वाच्या बातम्या 

IMP