लिड्समधील पराभवानंतर धवनची भावुक पोस्ट

टीम महाराष्ट्र देशा- लिड्स येथील भारता विरुद्धच्या तीसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने भारतावर ८ गडी राखून विजय मिळवला.या विजयाबरोबर इंग्लंडने भारता विरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ अशा फरकाने खिशात घातली. गेल्या दोन वर्षातील इंग्लंडचा हा मायदेशातील सलग सातवा एकदिवसीय मालिका विजय होता.या पराभवाची बरीच चर्चा होत असताना आता सलामीवीर शिखर धवनने क्रिकेट चाहत्यांसाठी एक भावुक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे शिखर धवनने?

मालिकेदरम्यान तुम्ही सर्वांनी संघाला खुप मोठा पाठिंबा दिला. आम्ही यशस्वी होण्यासाठी खुप प्रयत्न केला. पण संघाच्या हाती निराशा आली. मालिकेदरम्यान आमच्या हातून झालेल्या चुका सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र पुढच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी एकत्र येऊन आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करू. खेळात हार आणि जित असले तरी आम्ही प्रयत्न करायचे थांबणार नाही. कसोटी मालिकेत पुन्हा नव्या जोमाने मैदानात उतरू.

एकदिवसीय मालिकेत भारताची विजयी सलामी

मालिका खिशात घालण्यासाठी भारतीय टीम सज्ज

You might also like
Comments
Loading...