शिखर धवनचा पुन्हा गगन भरारी घेण्याचा निर्धार, सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय संघाला ऐन विश्वचषकात मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन याला दुखापत झाल्यामुळे तीन आठवड्यांसाठी विश्वचषकातून बाहेर जाव लागल आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शिखर धवनच्या उजव्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळं क्षेत्ररक्षण करताना मैदानावर देखील दिसला नाही. दरम्यान त्याची दुखापत स्कॅन करण्यात आली असून, त्याची दुखापत मोठी असल्याच फिजीओकडून सांगण्यात आल आहे. मात्र या दुखापतीमुळे खचून न जाता धवननं पुन्हा गगन भरारी घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यानं सोशल मीडियावर एक भावनिक कविता पोस्ट केली आहे.

Loading...

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या लढतीत शिखर धवनने शानदार शतकी खेळी केली होती. त्याने रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीसमवेत केलेल्या मोठ्या भागीदाऱ्यांमुळे भारतीय संघाला साडेतीनशेपार मजल मारता आली होती. मात्र या खेळीदरम्यान पॅट कमिन्सचा एक उसळता चेंडू हातावर बसून शिखरच्या अंगठ्याला दुखापत झाली होती.

 Loading…


Loading…

Loading...