टी-२० सामन्यात ‘कर्णधार’ म्हणून शिखर धवनने केला ‘हा’ खास विक्रम

shikhar

श्रीलंका : एकदिवसीय मालिकेतील विजयानंतर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा ३८ धावांनी पराभव केला आहे.  यासह भारताने तीन टी-२० सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने दिलेल्या १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपुर्ण संघ १२६ धावांवर अटोपला. या सामन्यात मधल्या फळीतील फलंदाज सुर्यकुमार यादवने ३४ चेंडुत ५ चौकार आणि २ षटकारासंह सर्वाधीक ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच कर्णधार शिखर धवनने या सामन्यात ३६ चेंडूमध्ये ४ चौकार व एका षटकाराच्या मदतीने ४६ धावांची खेळी केली.

या सामन्यात कर्णधार शिखर धवनने एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे. शिखर धवनने या सामन्यात  ३६ चेंडूमध्ये ४ चौकार व एका षटकाराच्या मदतीने ४६ धावांची खेळी केली. यासह त्याने टी२० मध्ये कर्णधार म्हणून पहिला सामना खेळताना भारताकडून सर्वाच्च धावा बनण्याचा विक्रम केला.

धवनने केलेला हा विक्रम आधी वीरेंद्र सेहवागच्या नावे होता. त्याने २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या पहिल्यावहिल्या टी२० सामन्यात संघाचे नेतृत्व करताना ३४ धावा केल्या होत्या. तसेच अजिंक्य रहाणे २०१३ मध्ये झिम्बाब्वे दौर्‍यावर भारतीय संघाचे टी२० सामन्यात नेतृत्व करताना ३३ धावांचे योगदान दिले होते.

महत्त्वाच्या बातम्या