fbpx

विश्वकप : शिखर धवन मायदेशी, तर ‘या’ खेळाडूची भारतीय संघात एंट्री

टीम महाराष्ट्र देशा : भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सामना १६ जूनला झाला. त्यावेळीच रिषभ पंत इंग्लंडमध्ये दाखल झाला होता. पण पंतला भारतीय संघात एंट्री देण्यात आली नव्हती. पण आजपासून मात्र पंत भारतीय संघात दमदार एंट्री घेणार आहे.

भारताच्या वर्ल्ड कप चालू असताना मोठा धक्का बसला. अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे भारताचा सलामीवीर शिखर धवनला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे रिषभ पंतचा आता संघात समावेश झाला आहे. दुखापत सुधारली नसल्याने, शिखर धवनने उर्वरित स्पर्धेतून माघार घेतली आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली. ”धवन वर्ल्ड कप खेळण्यासाठी फिट नसून त्याला रिकव्हर होण्यासाठी दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी लागेल. त्यामुळे तो वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेत आहे,” असे सूत्रांनी सांगितले आहे.

गावस्कर म्हणाले होते……..
शिखर धवन यांच्या जागी आता कोणत्या खेळाडूला संघात स्थान द्यायचे असा प्रश्न निर्माण झालेला असतानाच भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी धवनच्या जागी रिषभ पंतला संधी द्यावी असे मत व्यक्त केले आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन याला वर्ल्डकपमधून बाहेर जावे लागले आहे. ऑस्ट्रलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात धवनच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला तीन आठवड्यांसाठी वर्ल्ड कपमधून सुट्टी देण्यात आली आहे. तर पर्यायी खेळाडू म्हणून ऋषभ पंत, अंबाती रायुडू, श्रेयस अय्यर यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे.