शिखर धवन फिट तर रवींद्र जाडेजा तापाने ग्रस्त

जाडेजा पहिल्या कसोटीला मुकणार

टीम महाराष्ट्र देशा: भारताचा ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जाडेजा हा काही दिवसांपासून तापाने ग्रस्त असल्यामुळे  तो पहिला कसोटी सामना खेळणार कि नाही याबाबत शंका आहे. बीसीसीआयने एक पत्रक जारी करुन याबाबत माहिती दिली आहे.

bagdure

जाडेजाला ताप असल्यामुळे बीसीसीआयची मेडिकल टीम आणि केपटाऊनमधील स्थानिक मेडिकल टीम त्याची देखरेख करत असल्याचं बीसीसीआयने म्हटलं आहे. मेडिकल टीमने जाडेजाला रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला असून येत्या ४८ तासात त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकते. त्यामुळे तो खेळणार कि नाही हे सामना सुरु होण्याच्या दिवसी स्पष्ट होईल.

सलामीवीर फलंदाज शिखर धवन पूर्णपणे फिट असून तो दुखापतीतून सावरला आहे. तो पहिल्या कसोटीत खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे

You might also like
Comments
Loading...