मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा ! शेवगाव ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन !

शेवगाव: शहरात मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा यासाठी व ग्रामस्थांच्या वतीने शेवगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. शेवगाव शहरात दिवसेंदिवस मोकाट जनावरांची संख्या वाढत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. डुक्कर, कुत्रे, बैल गाई या प्राण्यांमुळे अनेकांवर जीवघेणा हल्लाही झालेला आहे. यामध्ये एकाही शाळेत जाणारी मुले जखमी झालेली आहेत. तरी या जनावरांचा बंदोबस्त नगरपरिषदेने तत्काळ करावा या मागणीसाठी शेवगाव ग्रामस्थांच्यावतीने शेवगावचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

तहशीलदार यांच्यावतीने गुंजाळ यांनी निवेदन स्वीकारले व नगरपरिषदेला या विषयावर तत्काळ कळविण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच सतीश पाटील लांडे, संजय नांगरे, वसंत गुरुजी लांडे,नगरसेवक वजीर पठाण, विक्रांत लांडे, तात्या पाटील लांडे, माऊली कराड, राहुल मगरे, तुषार पुरनाळे, रविंद्र लांडे, अनिल लांडे, संभाजी लांडे, बाबासाहेब नांगरे,राम नांगरे
ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.Loading…
Loading...