दघ्नेश्वर शिवालयात उद्यापासून गाथा पारायण सोहळा !

गाथा पारायण सोहळा

शेवगाव / निवृत्ती नवथर: दाघ्नेश्वर शिवालय दहिगाव या ठिकाणी उद्यापासून अखंड हरिनाम सप्ताह व श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा साजरा होणार आहे.या कार्यक्रमाचे आयोजन श्री कृष्णदेव महाराज काळे आणि अशोक महाराज बोरुडे तसेच दहिगाव येथील ग्रामस्थानी केले आहे.

तसेच या कार्यक्रमासाठी संगीत विशारद प्रकाश महाराज कातकडे,महेश महाराज हरवणे,राजू महाराज कातकडे, तसेच मृदूंग विशारद गिरीजीनाथ महाराज जाधव,साईनाथ महाराज जगदाळे हे उपस्थित राहणार आहे.