fbpx

सभापती डॉ क्षितिज घुले यांच्या हस्ते तळणीत विकास कामांचा शुभारंभ

शेवगाव / निवृत्ती नवथर : शासनाच्या दलित वस्ती सुधार योजनेतून शेवगाव तालुक्यातील तळणी येथे हाती घेण्यात आलेल्या विविध कामाचा शुभारंभ पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितिज घुले पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

तळणी येथे शासनाच्या दलित वस्ती सुधारणा योजनेतून गावठाण दलित वस्ती येथे ७ लाख रु खर्चाची स्मशानभूमी संरक्षक भीत,सावळे वस्ती येथे ३ लाख रु खर्चाचे पाणी पुरवठा पाईपलाईन तसेच वस्ती अंतर्गत ५लाख रु रस्ता सिमेंट कॉक्रिटिकरन आदी विकासाचे काम हाती घेण्यात आले आहेत.

या कामाचा शुभारंभ जेष्ठ नागरिक विष्णू तुपविहिरे यांच्या हस्ते तसेच सभापती क्षितिज घुले उपसभापती शिवाजी नेमाने,मंगेश थोरात,विस्तार आधिकारी मल्हारी इसारवाडे,गावचे सरपंच शिवाजी घुले आदींच्या उपस्थितीत करण्यात आला,कार्यक्रमात सेवा स्वस्थेचे उपाध्यक्ष किसन घुले, बाळासाहेब घुले,रामहरी घुले, नवनाथ झिंजे, ज्ञानदेव शहाणे, मारुती तुपविहिरे, दीपक तुपविहिरे, संतोष कोळगे,बबन घनवट,सुरेश डमाळ,अमोल बडे सहभागी झाले होते.ग्रामसेवक आसाराम कपिले यांनी सूत्र संचालन केले व अरविंद तुपविहिरे यांनी आभार मानले.