पुण्यात शेतकरी संघटनांकडून शासकीय अध्यादेशची होळी

पुणे – शेतकरी कर्जमाफी आणि आगाऊ 10 हजार उचलीचे निकष मान्य नसल्याने राज्यातील शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे . नुकतच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत मोठा गोंधळ झाला होता. आता राज्यभर शासनाच्या अध्यादेशची होळी करण्यात येत आहे . पुण्यातही याचे पडसाद पाहायला मिळाले. पुण्यात सुकाणू समितीच्या वतीने बालगंधर्व चौकात शासनाच्या अध्यादेशची होळी करण्यात आली आहे. एकदरीतच सरकार आणि शेतकरी संघटनामधील वाढता तणाव पाहता राज्यात पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन पेटण्याचे चिन्ह दिसत आहेत.