ती धोकादायक बारव बुजवणार; दोन दिवस आधीच झाला होता अपघात

JADHAVWADI

औरंगाबाद : दोन दिवसांपुर्वी घृष्णेश्वर कॉलनीतील सुरेवाडी रोडवरील बारवमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे स्विय सहायक दीपक मोरे यांच्या पत्नी व मुलगी पडून जखमी झाल्या होत्या. यामुळे परिसरातील नागरिक आक्रमक झाले होते. रविवारी आखेर घृष्णेश्वर कॉलनीतील रविवारी लोकसहभागातून ही जीवघेणी बारव बुजवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या बारवेत असलेली प्राचीन महादेवाची पिंड विधीवत पुजा करुन वर काढुन कॉलनीतील मंदिरात प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनेक दिवसापासून जळगाव रोड ते जाधववाडी बाजार समिती या रोडवर घृष्णेश्वर कॉलनीच्या वळणावर असलेली बारव बुजवण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिक करत होते. मनपा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. मात्र दोन दिवसापुर्वी जिल्हाधिकाऱ्याचे स्विय सहायक दीपक मोरे यांच्या पत्नी व मुलगी बारवेत पडून जखमी झाल्या. मग प्रशासनाला खडबडून जाग आली. रविवारी माजी उपमहापौर विजय औताडे, माजी नगरसेवक पूनम बमने, सीताराम सुरे, बन्सीलाल जाधव यांनी या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्या वेळी परिसरातील लोक मोठ्या संख्येने जमा झाले होते. दुर्घटना झाल्यावर तुम्हाला जाग आली का असा सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थितांना यावेळी केला.

दहा वर्षापासून पडीक जमिनीवर असलेल्या या बारवेत लोक कचरा टाकायचे ते टाळण्यासाठी काही लोकांनी इथे महादेवाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली होती. मात्र मागील आठवड्यात झालेल्या अपघातानंतर रविवारी मुर्ती नागरिकांच्या सहमतीने विधिवत पुजाआर्चना करुन बाहेर काढण्यात आली. या मुर्तीची प्रतिष्ठापना परिसरातील ग्रीष्मेश्वर महादेव मंदिरात करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिकांनी मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी तासाभरात आडीच लाख रुपये लोकवर्गणीही जमा केली.

महत्वाच्या बातम्या