मविआच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवारी दाखल केल्याने ‘या’ नेत्याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी 

mahavikas aaghadi sarkar

मुंबई  – विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अमरावतीतील अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केलेले चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांची पक्ष शिस्त मोडल्याप्रकरणी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली.

अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे यांना महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवारी दिली आहे. या मविआच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन निवडणूक लढवत आहे.

चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांना राष्ट्रवादी काँग्रेसने कोणताही पाठिंबा दिलेला नाही. पक्षाची शिस्त भंग केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या