शहजाद पुनावाला देणार राहुल यांच्या अध्यक्षपदाला कायदेशीररित्या आव्हान

राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होतील तो दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्याचं आवाहन

टीम महाराष्ट्र देशा- काँग्रेसला वंशवादापासून मुक्त करण्यासाठी आमचे कार्यकर्ते अकबर रोड ते अमेठीपर्यंत निदर्शने करणार असून राहुल यांच्या अध्यक्षपदाला कायदेशीररित्या आव्हानही देण्यात येणार असल्याचं काँग्रेसचे बंडखोर नेते शहजाद पुनावाला यांनी म्हटलंय .काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी होणारी निवड ही निवड नसून ती नियुक्ती असल्याचा आरोप करणारे आता राहुल यांच्याविरोधात आणखी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

शहजाद पुनावाला यांनी टि्वटरवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओत ज्या दिवशी राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होतील तो दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. त्यादिवशी सर्वांनी काळे कपडे परिधान करावेत, व्हाटसअप डिपी काळा ठेवावा आणि सोशल मीडियावरही काळा दिवस पाळण्यात यावा, असंही त्यांनी म्हटलं आहे.

You might also like
Comments
Loading...