नांदेड : कोरोना प्रादुर्भाव दिवसेदिवस पुन्हा वाढू लागल्याने काही महिन्यापुर्वी सुरू झालेली देवस्थाने पुन्हा भावीकासाठी बंद करण्यात येत आहेत. आता नांदेड अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले येथील प्रसिद्ध श्री दत्तात्रय संस्थान शिखर माहूरगड येथील मंदिर दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने तसे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील आदेश येई पर्यंत हे मंदिर बंदच राहणार आहे असे मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर भावीकासाठी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने इथली दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून अनेक जिल्ह्यामध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून श्री दत्तात्रय संस्थान शिखर माहूरगड दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मास्क न घातल्यास रिक्षा होणार जप्त, पोलिसांचा मोठा निर्णय
- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चित्रा वाघ घेणार राज्यपालांची भेट
- ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही आणि हा माणूस…’
- मंगल कार्यालयांना पालिकेचा दणका, शहरात एक लाखांहून अधिक दंड वसूली
- आणखी एका राज्यातील काँग्रेस सरकार कोसळलं; नारायणसामी सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश