काळवीटाला ही विठ्ठल भक्तिची ओढ

  पुणे :  भगवंताची भक्ति करण्यासाठी वन्यप्राणी ही  मागे नाहीत. शेगांव ते पंढरपूर वारीत वारकरी अनुभवत आहेत. पंढरपूर साठी निघलेल्या पायी वारीत एक काळवीट ही सहभागी झाले आहे

विदर्भाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री गजानन महाराज यांचा पालखी सोहळा दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर ला निघाला. सर्व वारकरी भक्ति मधे रमले असतांना त्यांना आणखी एक भक्त मिळाला. तो कळविट या प्राण्याच्या रूपात  गजानन महाराज पालखी  सोहळ्यात हिंगोली पासून ऐका कडपातिल काळविट वारीत सहभागी  झाले.  काळवीट पालखी  सोबतच चालत आहे. जिथे पालखी विसावा घेते  तिथेच काळवीट पण मुक्काम करते आणि सकाळी पालखी सोबत चालायला लागते. पालखी पंढरपुर ला पोहचल्या नंतर  वनविभागाची परवानगी काढुन काळवीटाला  श्री गजानन महाराज सस्थान, शेगांव  येथे नेण्यात येणार आहे. भक्ति ची कोणतीही सीमा नसते याची परिचीती या विठ्ठल भक्तावरून कळते.