fbpx

ग्लॅमर डॉलला केवळ फोटो काढण्यासाठी मत देऊ नका, उर्मिलावर शायना एनसींंचे टीकास्त्र

मुंबई : उर्मिला मातोंडकर केवळ ग्लॅमर डॉल आहेत. केवळ फोटो काढण्यासाठी त्यांना मत देऊ नका. उर्मिला यांना प्रत्यक्ष कामाचा कोणताही अनुभव नाही असे म्हणत कॉंग्रेसच्या उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यावर भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसींंने टीकास्त्र सोडले आहे. भाजपचे उत्तर मुंबई मतदारसंघातील उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या प्रचारयात्रेत सहभागी झाल्या होत्या.यावेळी बोलताना त्यांनी ही टीका केली.

उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी विरुद्ध कॉंग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांच्यात लढत होत आहे. शायना एनसी यांनी सोमवारी भाजपच्या अन्य नेत्यांच्या साथीने प्रचार केला. यावेळी त्यांनी मतदारांना गोपाळ शेट्टी यांना निवडून देण्याचे आवाहन त्या म्हणाल्या,गोपाळ शेट्टी यांची संसदेतील कामगिरीही उत्तम आहे. त्यांनी उत्तर मुंबईतील अनेक प्रश्न संसदेत मांडले. संसदेत त्यांची उपस्थितीही १०० टक्के आहे. याउलट , याकडे शायना एनसी यांनी नागरिकांचे लक्ष वेधले. उर्मिला मातोंडकर केवळ ग्लॅमर डॉल आहेत. केवळ फोटो काढण्यासाठी त्यांना मत देऊ नका असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.