सन्मानाने दिलेली शाल, फेटा, पागोटे आणि पगडी मुळीच काढणार नाही : विक्रम गोखले

पुणे : आज सन्मानाने दिलेली शाल, फेटा, पागोटे आणि पगडी आहे. ते मुळीच काढणार नाही असं म्हणत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी ‘पुणेरी पगडी’ वरून उदभवलेल्या वादावरून अप्रत्यक्षपणे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना टोला लगावला आहे . बालगंधर्व परिवाराच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्यामध्ये नाट्य-चित्रपटसृष्टीतील सुवर्णमहोत्सवी कारकिर्दीबद्दल ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते ‘बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

नेमकं काय म्हणाले विक्रम गोखले ?

सन्मानाने दिलेली शाल, फेटा, पागोटे आणि पगडी आहे. ते मुळीच काढणार नाही. हा खूप मोठा सन्मान आहे.संगीत रंगभूमीवरील बालगंधर्वांसारख्या मोठ्या कलाकाराच्या नावाने मिळालेला पुरस्कार आणि ज्या वास्तूला त्यांचे नाव दिले आहे, त्या रंगमंचावर काम करण्याची मिळालेली संधी या आनंदाच्या क्षणाने खूप हळवा झालो आहे..आवाज बसल्याने या चोवीस फूटाच्या पवित्र भूमीत पुन्हा येऊ शकणार नाही..याचीच खंत वाटते .

You might also like
Comments
Loading...