पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात ‘नमामि गंगे’ ऐवजी ‘शवामी गंगे’; काँग्रेस खासदाराची सडकून टीका

narendra modi

चंद्रपूर : कोरोना रुग्ण संख्येच्या वाढीबाबत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. सध्या भारतात सर्वाधिक कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

अशातच, उत्तर प्रदेश आणि बिहारमधून वाहणाऱ्या पवित्र गंगा नदीत सध्या मृतदेहांचा खच पाहायला मिळतोय. कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी ती गंगा नदीत टाकले गेल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माध्यमांमधून हा प्रकार समोर आल्यानंतर आता दोन्ही राज्यातील सरकार खडबडून जागं झालं आहे.

तर, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह सर्वच विरोधकांनी योगी सरकारसह केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. आता या प्रकारावर काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव लोकसभा खासदार बाळू धानोरकर यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलंय. मोदींच्या नेतृत्वात ‘नमामि गंगे’ ऐवजी ‘शवामी गंगे’चा प्रकार सुरु असून हा संपूर्ण भारतवासियांचा जगभरात झालेला अपमान आहे, असा घणाघात धानोरकर यांनी केला आहे. तसेच, कोरोना विरोधी लढ्यात मोदी सरकारनं विरोधी पक्षांना आणि त्यांच्या सुचनांना सामावून घेतलं पाहिजे, असा सल्लाही दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP