भाजपला  जुन्या – जाणत्या नेत्यांच्या मार्गदर्शनाची गरज – शत्रुघ्न सिन्हा 

नवी दिल्ली : भाजप आणि मोदींवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या  शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षावर निशाणा साधला आहे. जुन्या आणि ज्ञानी नेत्यांचे लालकृष्ण अडवाणी, यशवंत सिन्हा आणि  अरूण शौरी याचं सहकार्य घेण्याची वेळ आली असल्याचा सल्ला त्यांनी मोदींना दिला आहे.

पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे नाव घेत ते पुढे  म्हणाले की, आता वेळ आली आहे की पक्षाचे मोठे आणि ज्ञानी लोक, अडवाणीजी, जोशीजी, यशवंतजी आणि अरूण शौरींसारख्यांचा आशीर्वाद घेण्याचा. किर्ती आझादसारख्या सहकाऱ्याची पुन्हा गळा भेट घेण्याची वेळ आली आहे. सुबह का भूला अगर शाम को घर लौट आए तो उसे भूला नहीं कहते. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. यावरून लक्षात येते की कोणीच कायम अजेय नसतो, असा टोलाही त्यांनी यावेळी  लगावला. तसचं संवादाला सुरुवात नेहमी जुन्या जाणत्या नेत्यांपासून करायची असते असा सल्ला देखील त्यांनी यावेळी मोदींना दिला.