एका टीव्ही अभिनेत्रीसाठी मला मंत्रिपद नाकारलं गेलं : शत्रुघ्न सिन्हा

टीम महाराष्ट्र देशा- भाजपचे असंतुष्ट खासदार, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘मला कॅबिनेट मंत्रिपदाचं आश्वासन दिलं गेलं होतं. मात्र, एका टीव्ही अभिनेत्रीसाठी ते नाकारलं गेलं,’ असं म्हटलं आहे. त्या अभिनेत्रीचे नाव सिन्हा यांनी घेतलं नसलं तरी त्यांचा रोख केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांच्याकडं असल्याचं बोललं जात आहे. राजकारणात उतरण्याचा निर्णय घेणारे दक्षिणेतील दोन सुपरस्टार रजनीकांत व कमल हसन यांना सल्ला देताना शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नेमकं काय म्हणाले शत्रुघ्न सिन्हा?
‘राजकारण ही काही सोपी गोष्ट नाही. रजनीकांत व कमल हसन यांनी निर्णय घेण्याआधी सर्व बाजूंनी विचार केला असेल अशी आशा आहे,’ असं त्यांनी म्हटलंय. आपल्या कलाकार मित्रांना सावधानतेचा इशारा देताना शत्रुघ्न सिन्हा यांनी स्वत:चा कटू अनुभवही सांगितला. ‘पक्षात माझ्यासोबत भेदभाव करण्यात आला. माझा अपमान करण्यात आला. पक्षानं मला कॅबिनेट मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, वेळ येताच ते पद एका टीव्ही अभिनेत्रीला देण्यात आलं,’

Gadgil