fbpx

अहंकार हा प्रत्येकासाठी घातक असतो- शत्रुघ्न सिन्हा

modi-sinha

टीम महाराष्ट्र देशा- ट्रम्प असो, ‘मित्रों’ असो किंवा कोणताही विरोधी पक्ष नेता असो, अहंकार हा प्रत्येकासाठी घातक असतो असा टोला उत्तर प्रदेशातील भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपला लगावला आहे. पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला पराभवाचा झटका बसल्यानंतर भाजपवर विरोधकांकडून लक्ष्य केलं जात आहे. यातच आता सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधत घराचा आहेर दिला आहे.

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पोटनिवडणुकांचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या लोकसभा मतदारसंघांतच भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर केलेल्या ट्विटमध्ये सिन्हा यांनी मोदी आणि भाजपवर टीका केली आहे.
काय म्हटलं आहे सिन्हा यांनी
या निकालानंतर मला फक्त माझे मित्र योगी आदित्यनाथ यांच्यासाठी वाईट वाटत आहे. त्यांना घरच्या मैदानावर पराभव स्वीकारावा लागला. मात्र, अतिआत्मविश्वासामुळे आमचा पराभव झाल्याचे त्यांचा मुद्दा अगदी योग्य आहे.

मी वारंवार हेच सांगत आलो आहे की, लोकशाही राजकारणात अहंकार, तापटपणा आणि अतिआत्मविश्वास हे तुमचे सर्वात मोठे शत्रू असतात. मग ते कोणीही असो. ट्रम्प असो, ‘मित्रों’ असो किंवा कोणत्याही विरोधी पक्षाचा नेता असो. सिन्हा यांच्या ट्विटमधील ‘मित्रों’ या शब्दाचा रोख अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. सिन्हा यांनी यापूर्वीही अनेक जाहीर व्यासपीठांवरून नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती आणि धोरणांवर टीका केली आहे.