आपण भारतात राहतो का बनाना रिपब्लिकमध्ये; शॉटगनने पुन्हा डागली भाजपवर तोफ

Shatrugan Sinha

टीम महाराष्ट्र देशा: आधार कार्डचा होणारा गैरवापर चव्हाट्यावर आणणाऱ्या पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने देशभरातून सरकारवर टीका केली जात आहे. यावर आता शॉटगन म्हणून ओळखले जाणारे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. सरकारचा कारभार चव्हाट्यावर आणणाऱ्या पत्रकारावर गुन्हे दाखल केले जात आहेत हा कोणता न्याय आहे?, त्यामुळे आपण भारतात राहोत का बनाना रिपब्लिक सारख्या देशांमध्ये? असा सवाल सिन्हा यांनी केला आहे

‘द ट्रिब्यून’ वर्तमानपत्राच्या पत्रकार रचना खैरा यांनी आधारकार्डची माहिती अवघ्या ५०० रुपयांमध्ये विकली जात असल्याच वास्तव समोर आणल होत. यानंतर याचे वृत्त देणाऱ्या ट्रिब्यून विरोधात युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया’कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पत्रकार खैरा आणि त्यांना माहिती पुरवणाऱ्या तिघांना यामध्ये आरोपी करण्यात आल आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे खासदार असणारे शत्रुघ्न सिन्हा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला चांगलेच धारेवर धरताना दिसत आहेत. सिन्हा यांनी ट्विटकरत पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यावरून भाजपवर निशाना साधला.

Loading...