fbpx

भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा ‘आप’च्या पाठीशी

arvind-kejriwal-shatrughan-sinha

नई दिल्ली: आम आदमी पार्टीच्या २० आमदारांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निलंबित केले होते. त्यामुळे अरविंद केजारीवालांच्या आम आदमी पार्टीला चांगलाच धक्का बसला आहे. परंतु भाजप चे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप ला घरचा आहेर देत. आम आदमी पार्टीचे समर्थन केले आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरवर ‘आप’ आए, ‘आप’ छाए, ‘आप’ ही ‘आप’ चर्चा के विषय। घर घर में, हर खबर में तो फिर किस बात की फिक्र ‘आप’ को? असे म्हणत आम आदमी पार्टीचे समर्थन केले आहे. सिन्हा पुढे म्हणतात. ‘मैं उम्मीद और कामना करता हूं कि आप को जल्दी ही न्याय मिलेगा। ‘आप’ टीम और खासकर ‘आप’ को बहुत-बहुत बधाई, ध्यान रखें हितों की राजनीति ज्यादा दिन तक नहीं चलती। चिंता मत करें। खुश रहें, सत्यमेव जयते..जय हिंद’। शत्रुघ्न सिन्हा यांच्या ट्वीटमुळे भाजपमध्ये पक्षांतर्गत वाद निर्माण होण्याची श्यक्यता आहे. २०१८ वर्षाची सुरवात आम आदमी पार्टी साठी खूप वाईट झाली. आप च्या २० आमदारांना अपात्र ठरवण्यात आले. तसेच फटका कारखान्यात लागलेल्या आगीच्या मुद्द्यावरून भाजप आणि आप मध्ये शाब्दिक युद्ध सुरु आहे. दरम्यान शत्रुघ्न सिन्हा यांच्या ट्वीट खळबळ उडाली असून या ट्वीटला अरविंद केजारीवालानी री-ट्वीट केले आहे.