शशिकांत शिंदे यांनी निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी होती–शरद पवार

शशिकांत शिंदे यांनी निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी होती–शरद पवार

शरद पवार

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा एका मताने दारुन पराभव झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शिंदे समर्थकांनी रोष व्यक्त करत थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयावरच हल्ला केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वामुळेच हा पराभव झाल्याची प्रतिक्रिया आ. शशिकांत शिंदे यांनी दिली होती. यावरुन साताऱ्यात (Satara) राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चा केली असून त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार प्रतिक्रिया देताना म्हणाले, राज्यात पुढे महापालिका, नगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत. कार्यकर्त्यांनी याबाबत जागृत करणं रगजेचं आहे. अनेक तरुण नेत्यांशी मी आज संवाद साधला. शशिकांत शिंदे यांनी निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी होती. शशिकांत शिंदे यांचा निवडणुकीत एका मताने पराभव झाला. ही स्थानिक पातळीवरची निवडणूक होती. मविआ म्हणून आम्ही निवडणूक लढवलेली नाही. असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

आज सकाळीच साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये आमदार शशिकांत शिंदे, खासदार श्रीनिवास पाटील, (Shrinivas Patil) सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली होती. नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याची माहिती समोर येऊ शकली नाही.

या चर्चेनंतर आमदार शशिकांत शिंदे प्रतिक्रिया देताना म्हणाले होते, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीबाबत शरद पवार यांनी माहिती घेतली आहे. पराभवाचा वचपा काढण्यासाठी सातारा आणि जावळी या ठिकाणी लक्ष केंद्रीत करणार असून, सातारा नगरपालिकेची निवडणूक एक हाती जिंकणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या