fbpx

तराजुतून पडल्याने शशी थरूर जखमी, डोक्याला पडले ६ टाके

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेसचे जेष्ठ नेते शशी थरुर हे मंदिरात पूजेदरम्यान तुला करताना तराजुतून पडले. या दुर्घटनेत शशी थरुर यांच्या डोक्याला दुखापत झाली असून, जखम झालेल्या ठिकाणी ६ टाके पडले आहेत. त्यांना तातडीने जवळील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

तिरुअनंतपुरम येथील मंदिरात ते फळ आणि मिठाईंच्या तराजूत तुला करत होते. त्यावेळी ते पडले आणि त्यात त्यांच्या डोक्याला मार लागला. ही पूजा केरळमधील मोजक्याच मंदिरात केली जाते. यात वजनाइतकी मिठाई किंवा फळं या देवाला वाहिली जाते.

शशी थरुर हे माजी केंद्रीय मंत्री असून, केरळमधील तिरुअनंतपुरम येथून काँग्रेसचे खासदार आहेत. शिवाय, यंदाही ते याच लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात राजशेखरन रिंगणात आहेत. शशी थरुर सलग दोनवेळा तिरुअनंतपुरम येथून खासदार आहेत. त्यामुळे यंदा शशी थरुर हॅटट्रिक साधण्याच्या तयारीत आहेत.