शशी कपूर यांच्याऐवजी अनेकांनी वाहिली शशी थरूर यांना श्रद्धांजली

Shashi Tharur

टीम महाराष्ट्र देशा: प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जेष्ठ अभिनेते शशी कपूर याचं काल दुखद निधन झाले. त्यांच्या निधन बातमीने लाखो चाहत्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली. तर एका इंग्रजी वृत्तवाहिनीने चुकीने आपल्या अधिकृत ट्विटर हँड्लवरून शशी कपूर ऐवजी कॉंग्रेस नेते शशी थरूर यांच्या निधनाची बातमी पोस्ट केली. त्यामुळे ट्विटरवरील बातमीमुळे शशी थरूर यांच्या कार्यालयात अनेकांनी फोन केले. तर काहींनी नावाच्या साधर्म्यामुळे काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनाही श्रद्धांजली वाहिली.

 

दरम्यान थरूर यांच्या कार्यालयात सांत्वनाचे अनेक फोन येवू लागल्याने शेवटी त्यांनी ट्विट करत , ‘मी अजूनही जिवंत असल्याचे  तसेच मला वाटतं आता फक्त माझ्या शरीराचा एक भाग निकामी झाला आहे. एका चांगल्या, देखण्या चतुरस्त्र अभिनेत्याचं आज निधन झालं, माझं आणि त्यांचं नाव एकसारखं असल्यानं नेहमीच लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याच थरूर यांनी ट्विटमध्ये सांगितले.