fbpx

शशी थरुर यांची गर्लफ्रेंड पाकिस्तानी असल्यामुळे त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन रहावे : स्वामी

swami

टीम महाराष्ट्र देशा : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून संघ आणि भाजपवर नेहमी टीका करणारे कॉंग्रेस नेते खासदार शशी थरूर यांना सुब्रह्मण्यम स्वामी यांनी चांगलच धारेवर धरलं आहे. शशी थरुर यांची गर्लफ्रेंड पाकिस्तानमध्ये राहते. त्यामुळे त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन रहावे असा सल्ला भाजपा नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे . ती त्यांच्यासाठी जास्त योग्य जागा आहे असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

शशी थरुर यांनी भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास भारताचा हिंदू पाकिस्तान होईल असे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांना अनेकांनी भारत सोडून पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला. त्यावर थरुर यांनी मी त्यांच्यासारखा हिंदू आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला ? त्यांनी हिंदुत्वाचे तालिबानीकरण सुरु केले आहे असे विधान केले होते.

जम्मू कश्मीरच्या मुख्यमंत्री ‘मेहबुबा’ पाकिस्तानच्या- सुब्रमण्यम स्वामी

नेमकं काय म्हणाले सुब्रमण्यम स्वामी ?

तालिबान देश सोडून जाण्यासाठी दबाव टाकतात. आम्ही त्यांच्यावर दबाव टाकत नसून आम्ही फक्त सल्ला देत आहोत. थरुर यांची गर्लफ्रेंड पाकिस्तानी आहे. त्यामुळे पाकिस्तान त्यांच्यासाठी जास्त योग्य राहिल. तिथे ते जास्त आरामात राहू शकतात. ते स्वत:ला हिंदू म्हणतात पण ते स्वत:हा कधी हिंदू पत्नीसाठी उभे राहिले नाहीत .