fbpx

शशी थरूर हे ‘लव्हगुरू’ ते विरोध करणारच- अब्बास नकवी

टीम महारष्ट्र देशा – शशी थरूर हे लव्हगुरूर आहेत. कोणीही व्हॅलेंटाईन डेला धमकी दिल्यास लव्हगुरू त्याचा विरोध करेल, असे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी त्यांना म्हणत त्यांच्यावर निशाना साधला आहे.

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी शशी थरूर यांना लव्हगुरू म्हंटले आहे. ते म्हणाले कि, ते स्वतः लव्ह गुरु आहेत. त्यामुळे आता जर कोणी व्हॅलेंटाईन डे ला विरोध केला तर लव्ह गुरु तर त्याचा विरोध करणारच ना.’

१४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेम दिवस म्हणून जगभरात साजरा केला जात आहे. मात्र, हा पाश्चिमात्य संस्कृतीचा सण असल्याचे सांगत त्याला भारतातील काही कडव्या हिंदूत्ववादी संघटनांनी विरोध करीत आहेत. विरोध करताना यामुळे भारतीय संस्कृती बिघडत असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जातो.