मोदी साहेब, ‘मन की बात’ ऐवजी ‘जन आणि धन की बात’ बोला

टीम महाराष्ट्र देशा :कॉंग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्थव्यवस्थेवरून टोला लगावला आहे. त्यांनी पुणे येथे माध्यमांशी बोलताना ‘मोदी साहेब, ‘मन की बात’ऐवजी ‘जन आणि धन की बात’ बोला अस विधान केले आहे. ते एका कार्यक्रमासाठी पुणे येथे आले होते तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी देशातील आर्थिक स्थितीवर भाष्य करताना देशासमोर मंदीचे संकट असून अनेकांचा रोजगार गेला आहे. त्यावर सरकारकडून कोणताही मंत्री पुढे येऊन बोलण्यास तयार नाही. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून दर महिन्याला सुरू केलेली ‘मन की बात’ आज देखील सुरू आहे. पण, त्या दरम्यान देखील मंदीबाबत एक शब्द त्यांनी काढला नाही. अहो मोदी साहेब, ‘मन की बात’ऐवजी ‘जन आणि धन की बात’ बोला” अस विधान केले आहे.

पुढे बोलताना त्यांनी आगामी काळात आर्थिक स्थिती खूप भयानक होणार असून त्यातून सरकारने जनतेला बाहेर काढण्याची गरज आहे. पण सद्य स्थितीला तसे काही होताना दिसत नाही. यामुळे आपला देश कोणत्या दिशेने जाईल हे सांगता येणार नाही अशीही भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे देशाला लवकरात लवकर शक्य त्या उपाययोजन कराव्या लागणार आहेत.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी ‘एक भाषा एक देश हे धोरण भारताच्या एकतेसाठी योग्य नाही. 1965 मध्ये भारताने त्री भाषीय धोरण अवलंबले आहे. एक देश एक भाषा धोरण राबविल्यास भारतातील विविध भाषिक लोकांना दुय्यम वागणूक दिल्यासारखे होईल. भाजपाचे राजकारण हे हिंदी, हिंदुत्व याच्या भोवतीच चालते. त्यांना दक्षिण भारतामध्ये मते मिळत नाहीत. एक देश एक भाषा केल्यास भारतातील विविध भाषिक लोकांना दुय्यम वागणूक दिल्यासारखे होईल अस विधान केले आहे.

महत्वाच्या बातम्या