चॉकलेट हिरो शशी कपूर काळाच्या पडद्याआड

जेष्ठ अभिनेते शशी कपूर याचं निधन

मुंबई: जेष्ठ अभिनेते शशी कपूर याचं निधन झालं आहे.ते ७९ वर्षांचे होते.गेल्या काही काळापासून शशी कपूर यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर मुंबईतील कोकीळाबेन रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर प्रदीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली.

शशी कपूर यांचा जन्म 1938 मध्ये झाला होता. शशी कपूर यांच्या पश्चात कुणाल कपूर, संजना कपूर आणि करण कपूर असा परिवार आहे. शशी कपूर यांनी १९४० पासून बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत काम करायला सुरूवात केली होती. त्यांनी आतापर्यंत ११६ सिनेमांमध्ये काम केले असून त्यातील ६१ सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली .

You might also like
Comments
Loading...