ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर अनंतात विलीन

shashi kapoor

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्यावर सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ऋषी कपूर, नीतू कपूर, रणबीर कपूर, करीना कपूर, रणधीर कपूर, करिश्मा कपूर, शक्ती कपूर, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन, अनिल कपूर, संजय दत्त, सलमान खान, सुप्रिया पाठक, नवाजुद्दीन सिद्दीकी, नसिरुद्दीन शहा, अनिल कपूर, राणी मुखर्जी आदी दिग्गज कलाकार उपस्थित होते. साश्रु नयनांनी आणि भारावलेल्या वातावरणात शशी कपूर यांना निरोप देण्यात आला. सोशल माध्यमाद्वांरेही अनेक चाहत्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली. शशी कपूर यांचे सोमवारी सायंकाळी प्रदीर्घ आजारामुळे कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात कुणाल कपूर, संजना कपूर आणि करण कपूर असा परिवार आहे. त्यांनी आतापर्यंत११६ सिनेमांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.