शशांक खैतान म्हणतोय, मंजुळे यांनी ‘धडक’ पाहावा

 टीम महाराष्ट्र देशा : सध्या बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे, ती दिग्दर्शक शशांक खैतानच्या ‘धडक’ची. येत्या २० जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘इश्कबाज’, ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनियाँ’ या सुपरहिट चित्रपटांनंतर दिग्दर्शक शशांक खैतानचा बहुचर्चित ‘धडक’ हा मराठी चित्रपट ‘सैराट’ चा हिंदी रिमेक आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ला उदंड प्रतिसाद मिळाला होता.

अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड ‘सैराट’ ने तोडले असून आजही ‘सैराट’च्या ‘झिंग झिंग झिंगाट’ क्रेझ लहानापासून अगदी जेष्ठ नागरीकांपर्यंत आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर ही या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून ‘धडक’चा ट्रेलर आणि गाणी प्रदर्शित झाल्यापासूनच त्याची तुलना ‘सैराट’शी होऊ लागली आहे. पुढच्या शुक्रवारी म्हणजेच २० जुलै हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्यापूर्वी नागराज मंजुळे यांनी ‘धडक’ पाहावा अशी इच्छा शशांक खैतानने व्यक्त केली आहे. मंजुळे आणि त्यांच्या टीमसाठी शशांक स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजनदेखील करणार आहे. त्याचप्रमाणे नकारात्मक प्रतिक्रियांनाही सामोरं जाण्यासाठी मी सज्ज आहे असंही त्याने सांगितलं.’

‘धडक’मधील ‘झिंगाट’ आणि ‘पहली बार’ या दोन गाण्यांना प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. ‘सैराट’च्या तुलनेत हा रिमेक फिका पडतोय असंही मत अनेकांनी नोंदवलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रेक्षकांना ‘धडक’ कितपत आवडेल असा प्रश्नही निर्माण होत आहे. इशान खट्टर आणि जान्हवीची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आता बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

नागराज झळकणार चित्रपटातून; चित्रपटाचे पहिले पोस्टर झाल रिलीज

दुष्काळावर मात करत पार पडले ‘पिप्सी’ चे शुटींग’