संदीप वराळ हत्यांकांडातील शार्प शूटर जेरबंद

टीम महाराष्ट्र देशा/ प्रशांत झावरे : काँग्रेसचे नेते माजी उपसभापती संदीप पाटील वराळ हत्याकांडातील शार्पशूटर सुशील लाहोटी व अनिल चव्हाण यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आज पुण्यातील खडकवासला भागातून जेरबंद केले. सुशील लाहोटी यानेच सर्वप्रथम वराळ यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यापाठोपाठ चव्हाण याने हल्ला चढवला. या दोघांच्या अटकेमुळे या हत्याकांडाचा कट रचणाऱ्यांमध्ये आणखी कोणाचा हात आहे याचाही उलगडा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वराळ हत्याकांडानंतर या परिसरात एकच खळबळ उडाली होती व प्रचंड दहशत पसरली होती.

मागील वर्षी जानेवारी महिन्यात संदिप पाटील वराळ यांचा पूर्ववैमनस्यातून धारधार हत्याराने वार करून व नंतर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात प्रवीण रसाळ टोळी संबंधित काही गुन्हेगारांना अटक झाली आहे. या प्रकरणात विकास रसाळ व प्रवीण रसाळ यांच्यासह काही आरोपीना या आधीच अटक केली असून, पोलीस गेल्या एक वर्षांपासून या आरोपींच्या शोधात होते. पोलिसांना हे आरोपी पुण्यात असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी सापळा रचून शार्पशूटर सुशील लाहोटी आणि अनिल चव्हाण यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून अटक केली आहे. या आरोपींवर आता मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

You might also like
Comments
Loading...