शर्मिष्ठा मुखर्जी प्रणव मुखर्जींच्या ‘त्या’ फोटोवरून नाराज

नागपूर : काल माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नागपुरात संघाच्या तृतीय वर्षाच्या शिक्षा वर्गामधील स्वयंसेवकांशी संवाद साधला. यामध्ये सुमारे ६०० स्वयंसेवक सहभागी झाले होते. मात्र प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या कार्यक्रमाला हजरी लावल्याने त्यांची मुलगी आणि काँग्रेसच्या नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी या चांगल्याचं नाराज झाल्यात. त्यांनी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी देखील प्रणव मुखर्जी यांना सांभाळून राहण्याचा सल्ला दिला होता. संघ आपला चुकीच्या पद्धतीने वापर करू शकतो असं देखील म्हंटलं होतं.

दरम्यान काल प्रणव मुखर्जी हे संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर आज देखील शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. कालच्या कार्यक्रमानंतर सोशल मीडियावर मुखर्जी यांचा फोटोशाॅप केलेला एक फोटो फिरतोय. त्यात ते संघाप्रमाणे अभिवादन करताना दिसतात. त्यावर शर्मिष्ठा मुखर्जी म्हणाल्या, मला ज्याची भीती होती, तेच झालं. त्या म्हणाल्या, प्रणव मुखर्जींचे बदललेले फोटो पाहून मी म्हणत होते तेच घडलं. भाजप आणि संघाच्या डर्टी ट्रिक्स डिपार्टमेंटचं हे घाणेरडं राजकारण आहे. म्हणूनचं मी त्यांना संघाच्या कार्यक्रमाला जाताना सावध राहण्याचा सल्ला दिला होता.